दशावतार

दशावतार

विष्णू देवाचे दहा अवतार आहेत असे मानले जाते ह्यालाच दशावतार म्हणतात.

दशावतार (/ˌdæʃəˈvætərə/संस्कृत: दशावतार, daśāvatāra) श्रीविष्णू नारायण १० वेळा जन्म भूतळावर प्रकट झाले.

हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्मग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरुपात प्रसिद्ध आहेत.

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतात[१]संपादन करा

मूळ श्लोक

   यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
   अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥
दशावतार
Vishnu Avatars.jpg

विश्वाचे पालन - इत्यादींची अधिपती देवता

मराठीदशावतार
संस्कृतदश अवताराः
निवासस्थानक्षीरसागर स्वर्ग आकाश जल
लोकवैकुंठ
वाहनगरुडशेष नाग
शस्त्रसुदर्शन चक्र, कौमोदकी गदाकमळशंख
पत्नीलक्ष्मी
अन्य नावे/ नामांतरेकेशव, नारायण, माधव, गोपाळ, गोविंद, हरि, जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम, पद्मनाभ, पुरुष, उपेंद्र
या देवतेचे अवतारमत्स्यकूर्मवराहनृसिंहवामनपरशुरामरामकृष्णकल्कीदत्तात्रेयधन्वंतरी,मोहिनी,सूर्य
या अवताराची मुख्य देवताविष्णू,नारायण,
मंत्रॐ नमो भगवते वासुदेवाय नमः, ॐ नमो नारायणाय
नामोल्लेखश्रीमद भागवतविष्णु पुराण
तीर्थक्षेत्रेतिरुपतीपंढरपूर

संदर्भित अन्वयार्थ

भारत = हे भारता(भरतवंशी अर्जुना), यदा यदा = जेव्हा जेव्हा, धर्मस्य = धर्माची, ग्लानिः = हानि, (च) = आणि, अधर्मस्य = अधर्माची, अभ्युत्थानम्‌ = वृद्धी, भवति = होते, तदा हि = तेव्हा तेव्हा, अहम्‌ = मी, आत्मानम्‌ = आपले रूप, सृजामि = रचतो म्हणजे साकाररूपाने लोकांच्या समोर प्रकट होतो ॥ ४-७ ॥

अर्थ- हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. ॥ ४-७ ॥

मूळ श्लोक

   परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ ।
   धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

साधूनाम्‌ = साधूंचा म्हणजे चांगल्या मनुष्यांचा, परित्राणाय= उद्धार करण्यासाठी, दुष्कृताम्‌ = पापकर्म करणाऱ्यांचा, विनाशाय = विनाश करण्यासाठी,  = आणि, धर्मसंस्थापनार्थाय = धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी, युगे युगे = युगायुगात, सम्भवामि = मी प्रकट होतो ॥ ४-८ ॥

अर्थ- सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. ॥ ४-८ ॥

अर्थात हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.

  • मत्स्य: कूर्मो वराहश्च नरसिंहश्च वामन: रामो रामश्च रामश्च कृष्ण: कल्कि च ते दश।

मासा ,कासव , वराह, मानवी सिंह, वामन (बटू ब्राह्मण)

परशुराम, दशराथी राम, बलराम,आणि कल्की ते दहा.

-सॅन्टकम प्रवेशद्वार, आदिवराह गुफा (7 वे शतक), महाबलीपुरम;

सर्वात आधी अवतार- संबंधित पुरालेख

श्री देवविष्णू एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढील प्रमाणे आहेत.

  1. मत्स्य
  2. कूर्म
  3. वराह
  4. नरसिंह
  5. वामन (बटू ब्राह्मण) दक्षिण भारतात उपेन्द्र नावाने ओळखले जाते.
  6. परशुराम
  7. श्रीराम
  8. श्रीकृष्ण
  9. गौतम बुद्ध
  10. कल्की

आणि विष्णूचा ९ व्या रूपाला गौतम बुद्ध यांच्या रूपात समजले जाते.

Comments